|| शब्दांची पालखी ||

माझ्यासाठी वारी, शब्दांची पालखी
नाचवी आनंदे, खांद्यावरी

शब्दांचिया गावा, नसे काही भेद
नाही राग लोभ, न कुणी सान थोर

बहु वापरती, क्रोधे दूषणांते
प्रार्थनेस कामी, येणे व्हावे

शब्दांतुन ध्यान, शब्दांतुन ज्ञान
शिकुनिया जगी, मोठेपण

                     – अतुल सरपोतदार

2 thoughts on “|| शब्दांची पालखी ||

Leave a comment