लग्नाळु

तुम्ही तिशीच्या उंबरठ्यावर आलेला असता किंवा नुकतीच तिशी ओलांडलेली असते. “अजून settle नाही, काय घाई आहे ?”, “… त्याचं होउदे की आधी” वगैरे (आणि खरं म्हणजे, Bachelor / Tension Free जगण्याची हौस भागवण्यासाठी जितकी देता येतील तितकी) कारणं देत तुम्ही आत्तापर्यंत लग्नाचा विषय टाळलेला असतो. पण एव्हाना परिस्थिती जरा बदललेली असते. तुमचं स्वतःचं घर झालेलं असतं, नोकरीत बऱ्यापैकी जम  बसलेला असतो.

आणि मग एक दिवस –

“बास झालं आता ! आजच जाऊन नाव नोंदवूया हो याचं !….. अरे सारं ठरायला वेळ जाइलच कि रे..आजकाल मुली मिळणं सोपं नाही राहिलं..”

थोडिफार चिडचिड, थोडेे आढेवेढे असं सारं कही झाल्यावर अखेर तुमची संमती ‘मिळवली’ जाते आणि officially तुमच्यासाठी “वधुसंशोधन” सुरु होतं. पुढे काय काय वाढून ठेवलय याची अर्थातच तुम्हाला कल्पना नसते.

“तर मग.. यंदा कर्तव्य आहे !”

“लग्न” या विषयावर लोक खरच फार मनापासून सल्ले देतात (खरं तर न विचारतादेखील !) त्यात तुमच्या घरात, आजुबाजुला माणसांचा गोतावळा असेल तर मग बोलायलाच नको…

आई-वडील

“अपेक्षा काय आहेत तुझ्या ?” सुरुवात इथून होते.
तुम्ही – “अपेक्षा.. ?”
क्षणभर घराच्या कर्जाचे हफ्ते, इतर खर्च, ऑफिस मधल्या Married मित्रांच्या संभाषणातुंन कळलेले Jr KG वगैरेचे donation चे आकडे तुमच्या डोळ्यांसमोर तरळतात आणि तुमचं उत्त्तर येतं – “नोकरी करणारी हवी !”

दरम्यान एखाद्या विवाहसंस्थेत तुमचं नाव नोंदवून झालेलं असतं आणि तिथून तुम्हाला स्थळं याला सुरुवात झालेली असते. या विवाहसंस्थेचा कारभार Online चालत असल्याने तुमच्यावर तीही एक नवी जबाबदारी येऊन पडलेली असते.

मग सकाळ संध्याकाळ सुरु होतो follow up !

“कुणाकडून काही आलय काय रे आज ? बघत जा ते रोज.”

इतका follow up कि.. ‘Office मधला Manager परवडला’ म्हणायची वेळ तुमच्यावर येते.

नातेवाईक आणि आप्तजन

हे प्रकरण थोडं वेगळ असतं. प्रत्येकजण तुमची परीक्षा बघत असतो.

“काही जमतय का ? कुठवर आलं ?” काका.

“नेमकी हवी तरी कशी तुला ? कुठं जमवलं नाहियेस ना आधीच ? हो..नाहीतर नंतर सांगायचास.” काकू

“शाळा कॉलेजात नाही काय रे कोणी पटली ? काय तू !” आत्त्या.

तुमच्या काही मैत्रिणी भावांना ऐकून माहिती असतात.
“ती कॉलेज मधे होती ती… ती रे Jr होती तुला. तीचं झालं ? ती कोण ती.. U.S. ला असते.. तुला एक-दोनदा फोन आला होता .. तीच झालंय काय ?” आणि ती ..? तूम्ही एकत्र जायचात Office ला..”

“याचं नक्की काहितरी चालु आहे.. आजकाल बघावा तेव्हा फोन मधे असतो.. आता Password पण टाकलाय मोबाइल ला..”

तुमची बहिण ! आजपर्यंत तुम्ही तीला किती छळलयत याची जाणीव ती पदोपदी करुन देते.

“साधी एक पोरगी पटवता नाही येत आणि म्हणे मी Software Engineer”

“आता याचा काय संबंध ईथे ?” तुम्ही.

मित्रपरिवार

एव्हाना यातल्या बऱ्याच जणांच्या कार्याला तुम्ही उपस्थिती लावलेली असते. काहीजण तर बरेच ‘पुढे’ निघुन गेलेले असतात.

“तुझं कधी ? घरचे बघतायत की नाही ?… किती बघितल्यास ?..”

“अरे.. ‘सगळं ‘ वेळेत झालेलं चांगल ..”

त्यातलाच तुमचा एखादा खास ..

“हे कविता वगैरे जरा बाजूला ठेव आता..तो जमाना गेला.. मुली काय अशा पटणारेत काय ?. ”
तुम्ही – “खरय मित्रा ! ”

“तू सांग रे फक्त.. कशी मुलगी हवी ? मी शोधतो.”
तुम्ही- “नको !”

“अरे आम्हाला मिळाल्या … तु कशाला tension घेतोस ?”
तुम्ही – “Hmm”

या “Hmm” ची Power तुम्हाला एव्हाना कळायला लागलेली असते.

तुम्ही स्वतः

तुम्ही आता हा विषय खरच गांभीर्याने घेतलेला असतो. त्यात Facebook वर रोज कुणाच्या तरी Engagement किंवा लग्नाचे फोटो अपलोड होत असतात. Tension वाढत असतं…..

आणि या सगळ्यात एक प्रश्न राहून राहून तुमच्या मनात येत असतो..

“… ‘तेव्हा’ हिम्मत करायला हवी होती काय ? …”

  

Advertisements

3 thoughts on “लग्नाळु

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s