खरं सांगायच तर ..

जगणं रोज बाहेर पडू बघतं..
पण शरीर ठेवतं त्याला बांधून
धमन्यांतून..नसांतून..
उरते ती धडधड आणि धडपड …
हृदयाच्या ठोक्यांतून…

कधीतरी शरीरच हरतं मग..

मनाचं थोडं निराळं….
शरीर हटकून प्रयत्न करतं
कि ठेवावं कशाततरी गुंतवून..
कोणात अडकवुन…
पण ते जातं …
वाऱ्याचा हात पकडून..
रानावनांत भटकतं
फुलापानांच्या.. किड्यामुंग्यांच्या.. दुनियेत
मुशाफिरी करत फिरतं..

हे वेळ.., काळ.. वगैरे शरीरानेच सांभाळायचं…

पण मावळतीच्या सूर्याचं बोट पकडून
क्षितिजावर दोन डुबक्या घेतल्या..
की ते येतं परत…
शेवटी विसावा हा लागतोच.. मन असलं म्हणून काय झालं..?

प्रश्नं ..,उत्तरं.., स्वप्नं.. सारा मनाचाच प्रपंच..
काहीतरी शोधत असतं बिचारं.. सतत..

इथेहि कधीतरी शरीरच हरतं मग..

                       – अतुल सरपोतदार

2 thoughts on “खरं सांगायच तर ..

Leave a comment