Dil Dhoondta Hai …

image

परवा जुन्या फाइल मधे बालवाडीतली प्रगतिपुस्तकं मिळाली. आमची बालवाडी म्हणजे लहान शिशु आणि मोठा शिशु !  (अलीकडे त्याची Jr KG – Sr KG झालीय.) त्यावर वर्ग शिक्षकांनी लिहिलेले शेरे वाचताना जाणवलं खुप वर्ष निघुन गेली मधे.

“ताक करायला आवडते”, “स्वर ओळखता येतात”, “चित्रकलेची आवड आहे”, “इतरात मिळून मिसळून राहतो” वगैरे..

ह्यतील ताक करणे प्रकार म्हणजे आम्हाला एका प्लास्टिक च्या तांब्यात साबणाचं पाणी दिलं जायच. खर तर तेव्हाचं आता सगळ नीट आठवत नाही, पण काही गोष्टी तुम्ही विसरुच शकत नाही.. बालवाडीची ती वास्तु,  वर्ग शिक्षक, आम्ही chocolates वाटून केलेले वाढदिवस… आणि अगदी तेव्हापासून घट्ट जमलेलं मैत्र !

मी काही फार emotional category तला वगैरे नाही. वरती किती ‘घट्ट मैत्री’ वगैरे लिहिल असलं तरी मित्रांच्या गळ्यात गळे घातलेले (दिल चाहता है type) माझे फार फोटो तुम्हाला दिसणार नाहीत. मित्राचा फोन आला किंवा मी केला तरी प्रेमाने त्याला अस्खलित चार शिव्या घालायला मला अजुनतरी जमलेलं नाही. कितीतरी वेळा एकत्र ‘बसुनही’ चकन्याच्या पुढे मी त्यांना साथ दिलेली नाही. पण मग मी अनुभवलेली, जपलेली मैत्री काय ? जर सांगायच झालच तर – ‘मित्रांच्या घोळक्यातला मी तो एक ज्याने ते मैत्रीचे क्षण त्यांच्याएवढेच enjoy केले, करतो.. पण बऱ्याचदा त्यांच्याही नकळत..’

वो रंग कुछ इस तरह चढ़गये कि बस पूरी जिंदगी रंगीन हो गयी…

आधी म्हटलं तस आम्ही अगदी शब्दशः chuddy buddies. काही नंतर आले पण तेही तेवढेच जवळचे झाले..

‘आयुष्यातली 13-14 वर्ष (कदाचित जास्तीच) जेव्हा तुम्ही एकत्र असता तेव्हा खरच तुम्हाला मैत्रीच्या व्याख़्या लागत नाहीत.”

या जगात अभिषेकला ‘कोब्या’ नावाने किती जण हाक मारत असतील ?… पावसकरला ravati, निखिलला bandya किती जण म्हणत असतील ? (अजुन तशी बरीच नावं आहेत, पण सगळ्यांच्या वडिलांची नावं घेतलेली इथे बरी दिसणार नाहीत.. 😉 )

“Dil Dhuundhataa hai phir vahii furasat ke raat din…”

लहान असताना ‘मोठे कधी होणार’ हा प्रश्न असतो. पण मोठे होताना जाणवत की बऱ्याच गोष्टी आपण तिथेच विसरून आलो. त्याच साऱ्या ‘आठवणी’ होतात.. अगदी आयुष्यभरासाठी !!

आज ती पलिकडच्या कम्पाउंडमधुन अनिकेतची हाक येत नाही. सकाळची शाळा सुटल्यावर कोब्याच्या घरी घालवलेला दिवस नाही (रोज त्याच्या घरी गेल्यावर कोब्याच्या आजीने केलेले लाड नाहीत..तिथल्या ऑफिस मधे खेळलेले computer games नाहीत.. ).. सिद्धेशच्या अंगणात साजरे झालेले 26 जानेवारी,15 ऑगस्ट नाहीत. (रत्नागिरित फार कमी मोकळ्या जागा अश्या आहेत जिथ आम्हीे cricket खेळलो नाही. पण सिद्धेशच घर, जोशी
पाळंद इथली मजा काही औरच होती) अमित अनिरुद्धच्या घरी केलेला अभ्यास नाही. राहुलच्या घरी झालेली ‘विमाने उडवा’ ची प्रात्यक्षिकं नाहीत. मनालच पुस्तक घेऊन 9 वीत केलेला प्रोजेक्ट नाही..(ते पुस्तक अजूनही माझ्याकडेच आहे.. :)) आणि बरच काही नाही….

आज रोज भेटिगाठि होत नाहीत. पण facebook आहे, whatsapp आहे, आम्ही सगळे (अगदी वर्गातल्या बहुतेक मुली सुद्धा) connected आहोत. मैत्रीची ती ओढ आजही कायम आहे. (Group वरची भांडणं पाहिलित तर यातल काही एक खरं वाटणार नाही..पण ती आहे)

काळ पावसासारखा पडून जातो मुसळधार सरीत..
पण त्याला माहीत असतं कुठल्या गोष्टी पुसून टाकायच्या..
मैत्री मात्र तो प्रत्येक सरीमागे अजुन लख्ख करुन सोडतो…

                           – अतुल सरपोतदार

ही पोस्ट वाचल्यावरचे काही आभिप्राय 🙂 (guesses)

कोब्या – सर senti झालात एकदम…
Bandyaa – ek number Sir..
Rhutu – mastach…
अनिकेत – छान..

आणि….

राहुल – atul तुला ताक करायला आवडायच ?

image

image

image

Advertisements

5 thoughts on “Dil Dhoondta Hai …

  1. अतूल खरच मनापासून तूझे कौतूक. मलाही लहान सिध्देश आणि तूम्ही सर्व आठवलात कधी वेळ मिळेल तेव्हा नक्की या सर्व ़सिध्देशच्या लग्नात सर्व नक्की भेटू

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s