aankhon mein toofaan sa kyon hai…

in memory of one of my dearest friends.. .. “kobya” ( Abhishek Parulekar ).. we all miss you…

मित्रांनो !.. आपण सहावीत असु तेव्हा.. कोब्या पडला कुठेतरी, हात fracture झालेला उजवा.. आठवडाभर शाळेत नव्हता आला. आपण घरी गेलेलो त्याच्या.. त्याची आई काळजीत होती ; ..त्याच्याही आणि त्याच्या अभ्यासाच्याहि. त्याच्या आईला तेव्हा सांगीतलं होतं आम्ही दोघा तिघांनी – “काकू तुम्ही नका काळजी करू.. आम्ही बघतो त्याच्या अभ्यासाचं !”
ते बोलताना काहीतरी भारी वाटल होतं तेव्हा त्या वयात..

आता ?…

…… आता भेटायची हिम्मत पण नाही होणार काका काकूंना. काय सांगणार आहोत ??? …:'(

शाळेत एका बाकावर बसणाऱ्या मित्रांच/ मैत्रिणींच एक वेगळच bonding असतं.

कोब्या आणि मी एका bench वर बसायचो.. अगदी प्रार्थमिक शाळेपासून. तेव्हा पाचवीत वगैरे my best friend म्हणून त्याच्यावर पान भरून निबंध लिहिलेला आठवतोय.. आणि आज हे असं लिहितोय..
लिहितोय म्हणजे दोन दिवसांपासून मनात जे साचलय ते लिहून तरी जरा बर वाटेल अशी मनाची समजूत..

इयत्ता सहावी, सातवी, आठवी चे दिवस ‘कोबी’मय होते. म्हणजे शाळा सूटल्यावर पण मी त्याच्याबरोबरच असायचो. सहावीत शाळा भरायच्या आधी आणि नंतर सातवीत वगैरे सकाळची शाळा सुटली कि आम्ही त्याच्या घरी cricket खेळायचो.. मी, अभी, अपूर्व आणि अनीश. कधी अमेय दादा पण असायचा. त्याच्या घरात एंट्री घेतली की दोन बाजूला दोन जीने आहेत..त्या मधल्या passage मधे खुप गोंधळ घातलाय आम्ही. कामानिमित्त तिथे खुप लोकांच येणं जाणं असायचं. काका कधी कधी ओरडायचे पण. आणि कधी स्वतःदेखील एखादी ओवर टाकायचे. अनीश आमच्यापेक्षा लहान होता. अभी आणि अपूर्वने मिळून त्याला खुप रडवलय तेव्हा. कोबी तसा डॅम्बिस होता. गालावर खळी पडणारी माणसं तशी असतातच म्हणे थोडी :)..

Those were the Best Days of our lives !!

तो video cassettes चा जमाना होता. संध्याकाळी वगैरे आम्ही movie लावून बसायचो. Ghar Jamai नावाची R Madhavan आणि Mandira Bedi ची एक सीरियल लागायची. काही कार्टून्स लागायची.. अगदीच काही नाही तर आम्ही ऑफिस मधे जाऊन computer games खेळायचो.. त्याच्याकडे fish tank होता. कोबीला खुप इंटरेस्ट होता तेव्हा त्यात. कोबीबरोबर मीही जायचो कधी कधी झाडगावात त्या माशांच खाणं वगैरे आणायला.. कधी Razzak पण बरोबर असायचा..
आम्ही अभ्यास मात्र कमी केलाय एकत्र ;).. नाही म्हणायला एकदा सातवीत साळवी सरांच्या क्लासला prelim होती तेव्हा पूर्ण रात्रभर paper सोडवले होते आम्ही…

शाळेत तशी आमची चौकडी होती.. कोब्या, मी, Razzak आणि राहुल ! कोब्याने लय किडे केलेत वर्गात.. कुणा शिक्षकांना आजदेखील पटणार नाही. आपल्या वर्गात ज्या काही सो कॉल्ड ‘जोड्या’ लागल्या होत्या त्यातल्या कित्येक जोड्यांचा ‘ब्रह्मदेव’ कोब्याच होता. पक्का वस्ताद ! कुणाच भांडण लागलं की ते पेटवण्यात याला मजा !! (हे उद्योग तो ग्रुप मधे आत्ताहि करायचा.. पण ते आमच्यात.. मित्रांच्यात..) अशा मित्रांनाच मग खुप मिस केलं जातं…

ज्या हॉलमधल्या आठवणी मी जमवल्या होत्या त्याच हॉलमधे त्याला असं पाहणं.. मला.. मलाच काय साऱ्यांना आतून हलवणारं होतं. कसलातरी जबरदस्त राग येत होता.. काहींच सोबत असणं आपण आयुष्यभरासाठी गृहीत धरलेलं असतं !

आत्ताहि वाटतंय.. गेले काही तास मागे फिरले तर..?.. म्हणजे कोबी सकाळी उठलाय..आणि नेहमीप्रमाणे ग्रुप वर एखादा मेसेज…
“*चु आज लुंगी धुवुन ये.. नाहीतर लग्नात उगाच साऱ्यांना त्रास !”
“razzu आमच्यात ये तुझा योग्य तो आदर ठेवला जाईल… गेरुला नादी लावलानि काही लोकांनी !!”
“मिसळ खाण्यात कोणी इंटरेस्टेड ?…*जु, *रु, *ल्या ?
मी आलोय !”

माणसं जोडणाऱ्या लोकांच हे एक वाईट असतं.. जातात तेव्हा साऱ्यांना एकटं करुन जातात…

                                   – Kobi’s Benchmate

FB post link

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s