रत्नागिरी हापुस

पुलंनी विचारलं होतं, “तुम्हाला कोण व्हायचय ?..मुंबईकर, पुणेकर कि नागपुरकर ?” सर्व जमेच्या बाजू बघुन मी ‘पुणेकर’ झालो.

लहानपणापासून माझं हिंदी तसं जेमतेमच आणि त्यातुन कोकणातून ‘एवढ्या’ लांब नागपुरात जायचा मनात कधी विचारसुद्धा आला नाही; त्यामुळे नागपुरकर होण्याचा प्रश्नच नव्हता. तसही, बघीतल तर 70% नागपुरकर आजकाल पुण्यामुंबईतच रहातात व वर्षातून साधारण 2 वेळा नागपुरास जाऊन येतात. (आकडेवारी माझ्या मित्रपरीवारावरून ;)). आता तुम्हीच सांगा.. मग नागपुरपेक्षा मुंबई किंवा पुणेच बर नव्हे काय ?

मुंबई !!! … मुंबईकर होणे येरागबाळयाचे काम नव्हे हे मी तसं लवकर ओळखलं. स्पष्टच सांगायच तर माझ्या पहिल्या जोगेश्वरी ते अंधेरी प्रवासासाठी जेव्हा मला 2-3 ट्रेन सोडाव्या लागल्या होत्या तेव्हाच मी ते ओळखलं. So मुंबईला मी तेव्हाच ‘कर’ जोडले होते.

खर सांगायच तर गेल्या काही वर्षात रत्नागिरीकरांचा किंबहुना कोकणाचा कल मुंबईपेक्षा पुण्याकडे बऱ्यापैकी झुकलेला दिसतो. त्याची कारणही तशी obvious आहेत. Actually सद्य परिस्थितीत ‘तुम्हाला मुंबईकर व्हायचय का ?’ असं विचारायचा तरी धीर पुलंना झाला असता का कुणास ठाऊक ?  

असो ! तर बहुतेकांसाठी, आता मुंबई ही एखाद्या established movie actress सारखीच ! तीचे फोटो वॉलपेपर वगैरे ठेवण्यापर्यंतच पोच..तर पुणे अजुनही कुठेतरी theatre actress सारखं.. backstage ला गेल्यावर का होईना.. पण निदान एकत्र एक सेल्फ़ी तरी मिळेल असं! 

…आणि कोकणी माणुस हा तसा पहिल्यापासूनच आपली कुवत ओळखून रहाणारा ! 😝

रत्नागिरीकरांसाठी आळ्या ते पुण्यातल्या पेठा हा प्रवास तसा एकदम पटकन होतो. पुणेच कशाला, रत्नागिरीकर तसा कुठेही पटकन adjust होऊन जातो… अहो, काळजात शहाळी भरलेल्या माणसांचं कशाला कुठे काय अडतय ? (☺)..

हिरवागार निसर्ग, नारळी पोफळीच्या बागा (आता तशा कमी उरल्यात), आंबा, फणस – काजूने नटलेल्या वनराई..आणि या सर्वांना कडेवर घेऊन मिरवणारा समुद्र.. अहो काय कमी आहे आमच्या कोकणात ?  ..पण निसर्गावर पोट भरायचं तर अपार कष्ट करायची तयारी हवी..(तसही आता सगळेच काही व्यावसायिक नाही ना होऊ शकतं …😜 ) ..आणि खोटं बोलणार नाही, पण आपली आपली म्हणून काही ध्येय असतात की नाही ? (हे आपलं उगाच जरा कुठेतरी वाचलेलं ! 😆 )

असो, तर सांगायचा मुद्दा हा की अशा आम्हा रत्नागिरीकरांसाठी पुण्यासारखं दुसरं शहर नाही. मराठीचा जाज्वल्य अभिमान, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रात आपलं म्हणून काही देण्याची वृत्ती (मग ती फक्त एखाद्याला भरभरुन दिलेली दाद का असेना !), वेळप्रसंगी कशावरही मत (/मतभेद) व्यक्त करण्याची सवय आणि गरज पडलीच तर..समोरच्याचा कमीत कमी शब्दात अपमान करण्यासाठी लागणारी पुरेशी शब्दसंपत्ती ..बास ! या एवढ्या जोरावर रत्नागिरीकर पुणेकरांत मिसळून जातो.

आजकाल याबरोबर अजून 2 पदव्या घेतल्या की मग तो पुणेकर झालाच !.. एक म्हणजे जे काही करायच ते आपला आपला जीव सांभाळून.. थोडक्यात ‘अरे’ ला ‘का रे ?’ करण्यापेक्षा “जा रे ! ..” ला preference द्यायचा… (यात बहुतेक वेळा दोन्ही पार्टीज चा स्वाभिमान शाबुत राहतो..) हे रत्नागिरीकरास लवकर जमतेही (का रे ? म्हणून बाह्या सरसावुन येणारे वेगळे.. आम्ही रत्नागिरीकर सोडून देणाऱ्यांपैकी – ‘जा *** तू आणि तुझं नशीब .. वगैरे..’) आणि दूसरी म्हणजे ‘मुंबई विरुद्ध पुणे’ या वादात पुणे कसं उजवं आहे हे पटवून द्यायला शिकायचं (स्वतःला ते तसहि पटलेलं असतच, फक्त त्यावर भरभरुन बोलायला शिकायचं).. That’s it !..एव्हाना ती ‘पुणेरी’ पगडी आलीच समजा तुमच्या डोक्यावर !

बाकीच्या गोष्टी मग हळूहळू स्वाभावीकपणे अंगात भिनल्या जातात. पुलंनी त्यातल्या महत्वाच्या आधीच सांगून ठेवल्यात. बाकी गेल्या 8 वर्षांत मला कळलेल्या काही नवीन..आपल्या भावी पुणेकरांसाठी खालीलप्रमाणे..

जीवावर उदार व्हायचा मूड असेल तर आणि तरच traffic सिग्नलला थांबायचं, मागे किंवा पुढे एखादी मुलगी गाडी चालवत असेल तर अप्रत्यक्षरित्या तुमची driving test चालु आहे या concentration ने गाडी चालवायची (यात तुम्ही fail झालातच तर कमीत कमी ‘बावळट !’ हे संबोधन ऐकण्याची मानसिक तयारी असावी)..
रस्त्यांवरील खड्ड्यांचा map तुमच्या डोक्यात fit असला पाहिजे (खड्डा चुकवता नाही आला तर समजावं अजुन पोरगं नवखं आहे.. नाहितर तो खड्डा तरी नवीन आहे !)..
गाडीवर कोणी tripsy जात असेल तर त्यातला कोण कुठल्या बाजूला थुंकणार आहे हे ओळखता यायला हवं (on a serious note I tell you.. it’s a must have additional sense)…
या गोष्टी आपल्या आपल्या फायद्यासाठी शिकायच्या.. त्या पुणेकरांकडे उपजत असतात.. आणि म्हणून ते ‘पुणेकर’ असतात !

पण खरच ज्याचा अभिमान वाटावा असंच हे शहर ! पुण्याची चव वाढवायला रत्नागिरी हापुस प्रमाणे नवीन रत्नागिरीकरहि दरवर्षी पुण्यात दाखल होत असतो..  आणि मग ‘पुणेरी’पण मुरलं कि रत्नागिरीस गेल्यावर मांडवीत आपल्या मित्रांच्या अड्ड्यावर एक वाक्य हमखास ऐकवतो –

“पूर्वीची रत्नागिरी आता राहिली नाही यार.. आपल्या लहानपणी काय मजा होती ! ”

                               – अतुल सरपोतदार

Advertisements

14 thoughts on “रत्नागिरी हापुस

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s