‘पुल’कित…

image

आज पुलंचा स्मृतिदिन.. तस पुलंची आठवण व्हावी यासाठी कुणा “मराठी” माणसाला स्मृतिदिनाची आवश्यकता नसावी. ते सतत आसपास असतातच..

शाळेत “नाच रे मोरा” गाताना ते आपल्या आयुष्यात शिरतात ते कायमचेच ! तेव्हा आपल्याला ते कळत नाही इतकच .. पुढे सकाळच्या शाळेला जाताना “इंद्रायणी काठी..” कानावर पडतं तेव्हाहि ते सोबत असतात.. नंतर “सखाराम गटणे”, “चितळे मास्तर” वगैरेंशी ओळख झाली की ते जरा जवळचे वाटतात.. रावसाहेब, हरितात्या, नंदा, अंतु बर्वा वगैरे मंडळी कळायला लागली कि ..पुढे तर त्यांच्याशी मैत्रीच होऊन जाते.. (ह्यात वयाने आड येण्याएवढं तेहि अजुन ‘मोठं’ झालेलं नाही)… पुढे त्यांचं ‘चाळी’तील कुटुंबही आपलं होउन जातं.. मग काय कधी त्यांचा हात पकडून, कधी त्यांच्या कडेवर बसून आपण साऱ्या जगाची ‘अपूर्वाई’ अनुभवतो… एव्हाना अवघं आयुष्य पुलमय झालेलं असतं..

माणसाने मराठी ‘मातृभाषा’ म्हणून शिकावी आईच्या तोंडून.. मराठीतील व्याकरण, कर्तरी कर्मणि प्रयोग शिकावेत शाळेत शिक्षकांकडून.. ( ते पण मोठ्या आवाजात रामा-गोविंदाचं नाव घेत.. “राम शाळेत जातोsss..”वगैरे..).. मराठीतील अमृतवाणी ऐकावी संतवाणीतून.. मराठीतील प्रेम शिकावं ते पाडगावकर, ग्रेस यांच्या कवितांतून.. आणि मराठमोळं.. हसतखेळत.. आनंदात.. जगावं कसं ते शिकावं पुलंच्या लिखाणातून..भाषणांतून !!

आणखी काय लिहु ?.. अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व ते ! एका माझ्यासारख्याच ‘पुल’कित रसिकाने म्हटल्याप्रमाणे पुलंचीच काही वाक्य त्यांच्याबाबतीत शब्दशः लागू पडतात – 

“देवाने आमची लहानशी जीवनं समृद्ध करायला दिलेल्या ह्या मोलाच्या देणग्या ,न मागता दिल्या होत्या न सांगता परत नेल्या.”

– रावसाहेब

खरच…

“ह्या देवाघरच्या माणसाने आम्हाला खुप काही दिले”

– हरितात्या

‘हसवणुकी’त आणि ह्या साऱ्या ‘नसत्या उठाठेवी’त त्यांचा कायमचा ऋणी..

– अतुल सरपोतदार

Advertisements

3 thoughts on “‘पुल’कित…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s