‘पुल’कित…

आज पुलंचा स्मृतिदिन.. तस पुलंची आठवण व्हावी यासाठी कुणा “मराठी” माणसाला स्मृतिदिनाची आवश्यकता नसावी. ते सतत आसपास असतातच.. शाळेत “नाच रे मोरा” गाताना ते आपल्या आयुष्यात शिरतात ते कायमचेच ! तेव्हा आपल्याला ते कळत नाही इतकच .. पुढे सकाळच्या शाळेला जाताना “इंद्रायणी काठी..” कानावर पडतं तेव्हाहि ते सोबत असतात.. नंतर “सखाराम गटणे”, “चितळे मास्तर” वगैरेंशी ओळख झाली की ते जरा जवळचे वाटतात.. रावसाहेब, हरितात्या, नंदा, … Continue reading ‘पुल’कित…

मन काटेरी निवडुंग…

मन काटेरी निवडुंग.. हृदयास टोचते फार वाटे यावं दूर सोडून.. पण मन, तिचहि त्यातं अडकुनं… मन शेवरिचे जसे बीज.. वाऱ्यावर दूरं दूरं…. दहा दिशांस जाउन.. येई रुजुनिया रोजं… मन मातीला जसा गंध.. शरीरात धुंद धुंद … पहिल्या मेघाची ती प्रीत.. जेव्हा.. येई कोसळून… कुणी काहीही बोलावं.. भले काटेरी निवडुंग.. ना खोटा लपंडाव.. मन स्वतःशी हे खरं ….         – अतुल सरपोतदार Continue reading मन काटेरी निवडुंग…

रत्नागिरी हापुस

पुलंनी विचारलं होतं, “तुम्हाला कोण व्हायचय ?..मुंबईकर, पुणेकर कि नागपुरकर ?” सर्व जमेच्या बाजू बघुन मी ‘पुणेकर’ झालो. लहानपणापासून माझं हिंदी तसं जेमतेमच आणि त्यातुन कोकणातून ‘एवढ्या’ लांब नागपुरात जायचा मनात कधी विचारसुद्धा आला नाही; त्यामुळे नागपुरकर होण्याचा प्रश्नच नव्हता. तसही, बघीतल तर 70% नागपुरकर आजकाल पुण्यामुंबईतच रहातात व वर्षातून साधारण 2 वेळा नागपुरास जाऊन येतात. (आकडेवारी माझ्या मित्रपरीवारावरून ;)). आता तुम्हीच सांगा.. मग नागपुरपेक्षा … Continue reading रत्नागिरी हापुस

aankhon mein toofaan sa kyon hai…

in memory of one of my dearest friends.. .. “kobya” ( Abhishek Parulekar ).. we all miss you… मित्रांनो !.. आपण सहावीत असु तेव्हा.. कोब्या पडला कुठेतरी, हात fracture झालेला उजवा.. आठवडाभर शाळेत नव्हता आला. आपण घरी गेलेलो त्याच्या.. त्याची आई काळजीत होती ; ..त्याच्याही आणि त्याच्या अभ्यासाच्याहि. त्याच्या आईला तेव्हा सांगीतलं होतं आम्ही दोघा तिघांनी – “काकू तुम्ही नका काळजी करू.. आम्ही बघतो त्याच्या … Continue reading aankhon mein toofaan sa kyon hai…

आता सारे निवांत आहे…

अन्तःपुरात आता सारे निवांत आहे मी माझ्या जाणीवांचा रात्रीच खून केला… अंतरी धुमसणाऱ्या आगीचे निशाण नाही कळेना कशाने मग डोळ्यांत धूर केला… मिटल्या कळीची नाजुक बात होती.. का पाकळयांनी.. उघडून घात केला.. जगण्याची आस जर का, साऱ्यांस आहे… सांग त्याने… मरणास हात का केला ?…                 – अतुल सरपोतदार Continue reading आता सारे निवांत आहे…

तो ‘येतोे’ सांगून गेला…

तो ‘येतोे’ सांगून गेला… म्हणुनी दारात उभी मी आहे… तो गेला त्या वाटेने वारा… ना घेऊन मजला जाई.. आठवणींच्या पाचोळयाशी.. पण उगाच खेळत राही.. तो खेळ पाहण्याचा मी छंद जोडला आहे.. तो ‘येतोे’ सांगून गेला… म्हणुनी दारात उभी मी आहे… ते रुसवे फुगवे माझे त्याने ओंजळीत जपले होते.. आता रंग उडाल्या भिंतींना .. मी हसल्याचेही कवतुक नाही.. बंद खिडक्यांच्या पडदयांना.. जुने हसणे शिकवित आहे तो … Continue reading तो ‘येतोे’ सांगून गेला…

बघ अजुनी थोडे… 

साठी उलटून गेली … (More than 60 years of independence) तरी तारुण्य बहरात आहे … रणी शौर्य गाजवून झाले… थोडी मने जिंकणे ..अजुनी बाकी आहे… बदलाचे वारे नित्याचे येथे… जूने काही मातीशी.. अजुनी घट्ट आहे.. थोडे काळोख उजळून झाले… थोडे मळभ.. अजुनी बाकी आहे…. तिरंग्याचे रंग अजुनी… मिसळून येणे बाकी आहे… कुणी घेतली भरारी… कितींचे अजुनी… उडणे शिकायचे बाकी आहे… बघ अजुनी थोडे.. स्वातंत्र्य मिळवायचे … Continue reading बघ अजुनी थोडे… 

Dil Dhoondta Hai …

परवा जुन्या फाइल मधे बालवाडीतली प्रगतिपुस्तकं मिळाली. आमची बालवाडी म्हणजे लहान शिशु आणि मोठा शिशु !  (अलीकडे त्याची Jr KG – Sr KG झालीय.) त्यावर वर्ग शिक्षकांनी लिहिलेले शेरे वाचताना जाणवलं खुप वर्ष निघुन गेली मधे. “ताक करायला आवडते”, “स्वर ओळखता येतात”, “चित्रकलेची आवड आहे”, “इतरात मिळून मिसळून राहतो” वगैरे.. ह्यतील ताक करणे प्रकार म्हणजे आम्हाला एका प्लास्टिक च्या तांब्यात साबणाचं पाणी दिलं जायच. खर … Continue reading Dil Dhoondta Hai …

खरं सांगायच तर ..

जगणं रोज बाहेर पडू बघतं.. पण शरीर ठेवतं त्याला बांधून धमन्यांतून..नसांतून.. उरते ती धडधड आणि धडपड … हृदयाच्या ठोक्यांतून… कधीतरी शरीरच हरतं मग.. मनाचं थोडं निराळं…. शरीर हटकून प्रयत्न करतं कि ठेवावं कशाततरी गुंतवून.. कोणात अडकवुन… पण ते जातं … वाऱ्याचा हात पकडून.. रानावनांत भटकतं फुलापानांच्या.. किड्यामुंग्यांच्या.. दुनियेत मुशाफिरी करत फिरतं.. हे वेळ.., काळ.. वगैरे शरीरानेच सांभाळायचं… पण मावळतीच्या सूर्याचं बोट पकडून क्षितिजावर दोन डुबक्या … Continue reading खरं सांगायच तर ..