मन काटेरी निवडुंग…

मन काटेरी निवडुंग.. हृदयास टोचते फार वाटे यावं दूर सोडून.. पण मन, तिचहि त्यातं अडकुनं… मन शेवरिचे जसे बीज.. वाऱ्यावर दूरं दूरं…. दहा दिशांस जाउन.. येई रुजुनिया रोजं… मन मातीला जसा गंध.. शरीरात धुंद धुंद … पहिल्या मेघाची ती प्रीत.. जेव्हा.. येई कोसळून… कुणी काहीही बोलावं.. भले काटेरी निवडुंग.. ना खोटा लपंडाव.. मन स्वतःशी हे खरं ….         – अतुल सरपोतदार Advertisements Continue reading मन काटेरी निवडुंग…

आता सारे निवांत आहे…

अन्तःपुरात आता सारे निवांत आहे मी माझ्या जाणीवांचा रात्रीच खून केला… अंतरी धुमसणाऱ्या आगीचे निशाण नाही कळेना कशाने मग डोळ्यांत धूर केला… मिटल्या कळीची नाजुक बात होती.. का पाकळयांनी.. उघडून घात केला.. जगण्याची आस जर का, साऱ्यांस आहे… सांग त्याने… मरणास हात का केला ?…                 – अतुल सरपोतदार Continue reading आता सारे निवांत आहे…

तो ‘येतोे’ सांगून गेला…

तो ‘येतोे’ सांगून गेला… म्हणुनी दारात उभी मी आहे… तो गेला त्या वाटेने वारा… ना घेऊन मजला जाई.. आठवणींच्या पाचोळयाशी.. पण उगाच खेळत राही.. तो खेळ पाहण्याचा मी छंद जोडला आहे.. तो ‘येतोे’ सांगून गेला… म्हणुनी दारात उभी मी आहे… ते रुसवे फुगवे माझे त्याने ओंजळीत जपले होते.. आता रंग उडाल्या भिंतींना .. मी हसल्याचेही कवतुक नाही.. बंद खिडक्यांच्या पडदयांना.. जुने हसणे शिकवित आहे तो … Continue reading तो ‘येतोे’ सांगून गेला…

बघ अजुनी थोडे… 

साठी उलटून गेली … (More than 60 years of independence) तरी तारुण्य बहरात आहे … रणी शौर्य गाजवून झाले… थोडी मने जिंकणे ..अजुनी बाकी आहे… बदलाचे वारे नित्याचे येथे… जूने काही मातीशी.. अजुनी घट्ट आहे.. थोडे काळोख उजळून झाले… थोडे मळभ.. अजुनी बाकी आहे…. तिरंग्याचे रंग अजुनी… मिसळून येणे बाकी आहे… कुणी घेतली भरारी… कितींचे अजुनी… उडणे शिकायचे बाकी आहे… बघ अजुनी थोडे.. स्वातंत्र्य मिळवायचे … Continue reading बघ अजुनी थोडे… 

खरं सांगायच तर ..

जगणं रोज बाहेर पडू बघतं.. पण शरीर ठेवतं त्याला बांधून धमन्यांतून..नसांतून.. उरते ती धडधड आणि धडपड … हृदयाच्या ठोक्यांतून… कधीतरी शरीरच हरतं मग.. मनाचं थोडं निराळं…. शरीर हटकून प्रयत्न करतं कि ठेवावं कशाततरी गुंतवून.. कोणात अडकवुन… पण ते जातं … वाऱ्याचा हात पकडून.. रानावनांत भटकतं फुलापानांच्या.. किड्यामुंग्यांच्या.. दुनियेत मुशाफिरी करत फिरतं.. हे वेळ.., काळ.. वगैरे शरीरानेच सांभाळायचं… पण मावळतीच्या सूर्याचं बोट पकडून क्षितिजावर दोन डुबक्या … Continue reading खरं सांगायच तर ..

माझी संकोचकुंडले…

माझी संकोचकुंडले आता गहाण ठेवीन म्हणतो.. उरलेलं सारं आता बिनधास्त जगावं म्हणतो… मी किना-यावर पहात बसतो.. लाटांची शर्यत न्यारी… काही लाटा रांगत येती.. काही लाटा रांगत येती.. वाळूत उभा मी तेव्हा.. पाउल नकळत मागे घेतो… कधी पावसाचे थेंब टपोरे.. खिडकीवर हाक मज देती…. उघडावी खिड़की तेव्हा.. उघडावी खिड़की तेव्हा..  तर तिथेच त्या थेंबांच्या… नक्षितच मी रमतो… मी सारं टिपून घेतो.. काही मनात साठवून घेतो.. मनातलं … Continue reading माझी संकोचकुंडले…

ती अशीच हसावी रोजं …

ती अशीच हसावी रोजं … तिचे हास्य ऊर्जेचा स्त्रोतं .. मळभाचे मेघ भेदून.. पावसाळी पडावे जसे ऊनं.. दारात विड्याचा वेलं.. वाढते देखणी कमानं तिच्या हास्याच्या इंद्रधनुची.. पण नाही त्याला सर … मज कितिदा होती भासं .. जेव्हा पानांची सळसळं.. ती येउन हळूच अंगणात.. रमलीच जणू गप्पांत.. मनावर माझ्या जमती कधी चिंतांचे धूलिकणं…. त्यावर मारून एक फुंकरं .. ती अशीच हसावी रोजं …              – अतुल … Continue reading ती अशीच हसावी रोजं …

स्वप्नं…

त्यांनीही स्वप्नं पाहिली होती… कधी उघड्या डोळ्यांनी तर कधी भरल्या त्यांतही तुम्हीच होता.. भले म्हातारपणीचा आधार शोधण्याचा प्रयत्न त्यात असेलही… पण ती होती … तुमच्यासाठीच.. त्यांत मायेचा ओलावा होता.. त्यावरच प्रेमही तुमच्यासाठीच होतं.. पाऊसपाण्यात ती स्वप्नं वाहून गेली नाहीत.. उन्हातान्हांत करपूनही गेली नाहीत… अंगणात पडलेल टीपुर चांदणं बघता बघता ती आकारली होती.. ती स्वप्नं…. ती स्वप्नं प्रत्यक्षात उतरली.. तू सारं फक्त उपभोगलसं.. आज त्यांच्या तसबिरिला … Continue reading स्वप्नं…

|| शब्दांची पालखी ||

माझ्यासाठी वारी, शब्दांची पालखी नाचवी आनंदे, खांद्यावरी शब्दांचिया गावा, नसे काही भेद नाही राग लोभ, न कुणी सान थोर बहु वापरती, क्रोधे दूषणांते प्रार्थनेस कामी, येणे व्हावे शब्दांतुन ध्यान, शब्दांतुन ज्ञान शिकुनिया जगी, मोठेपण                      – अतुल सरपोतदार Continue reading || शब्दांची पालखी ||