आता सारे निवांत आहे…

अन्तःपुरात आता सारे निवांत आहे मी माझ्या जाणीवांचा रात्रीच खून केला… अंतरी धुमसणाऱ्या आगीचे निशाण नाही कळेना कशाने मग डोळ्यांत धूर केला… मिटल्या कळीची नाजुक बात होती.. का पाकळयांनी.. उघडून घात केला.. जगण्याची आस जर का, साऱ्यांस आहे… सांग त्याने… मरणास हात का केला ?…                 – अतुल सरपोतदार Continue reading आता सारे निवांत आहे…

Charcoal Portraits : Spruha Joshi

She is one of the finest actresses in Marathi Film, Theatre and Television industry. She also writes poems and let me tell you she is very good at it. In fact she recently made a debut as a lyricist in Marathi film. Want to know her beyond her acting skills ? Check out her blog at – http://kangoshti.blogspot.in Or read her poems. She has already … Continue reading Charcoal Portraits : Spruha Joshi

तो ‘येतोे’ सांगून गेला…

तो ‘येतोे’ सांगून गेला… म्हणुनी दारात उभी मी आहे… तो गेला त्या वाटेने वारा… ना घेऊन मजला जाई.. आठवणींच्या पाचोळयाशी.. पण उगाच खेळत राही.. तो खेळ पाहण्याचा मी छंद जोडला आहे.. तो ‘येतोे’ सांगून गेला… म्हणुनी दारात उभी मी आहे… ते रुसवे फुगवे माझे त्याने ओंजळीत जपले होते.. आता रंग उडाल्या भिंतींना .. मी हसल्याचेही कवतुक नाही.. बंद खिडक्यांच्या पडदयांना.. जुने हसणे शिकवित आहे तो … Continue reading तो ‘येतोे’ सांगून गेला…

बघ अजुनी थोडे… 

साठी उलटून गेली … (More than 60 years of independence) तरी तारुण्य बहरात आहे … रणी शौर्य गाजवून झाले… थोडी मने जिंकणे ..अजुनी बाकी आहे… बदलाचे वारे नित्याचे येथे… जूने काही मातीशी.. अजुनी घट्ट आहे.. थोडे काळोख उजळून झाले… थोडे मळभ.. अजुनी बाकी आहे…. तिरंग्याचे रंग अजुनी… मिसळून येणे बाकी आहे… कुणी घेतली भरारी… कितींचे अजुनी… उडणे शिकायचे बाकी आहे… बघ अजुनी थोडे.. स्वातंत्र्य मिळवायचे … Continue reading बघ अजुनी थोडे… 

ती अशीच हसावी रोजं …

ती अशीच हसावी रोजं … तिचे हास्य ऊर्जेचा स्त्रोतं .. मळभाचे मेघ भेदून.. पावसाळी पडावे जसे ऊनं.. दारात विड्याचा वेलं.. वाढते देखणी कमानं तिच्या हास्याच्या इंद्रधनुची.. पण नाही त्याला सर … मज कितिदा होती भासं .. जेव्हा पानांची सळसळं.. ती येउन हळूच अंगणात.. रमलीच जणू गप्पांत.. मनावर माझ्या जमती कधी चिंतांचे धूलिकणं…. त्यावर मारून एक फुंकरं .. ती अशीच हसावी रोजं …              – अतुल … Continue reading ती अशीच हसावी रोजं …